संविधान वाचनाने ही मुलं भविष्यातील चांगला व जबाबदार नागरिक बनतील असा विश्वास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला
पुणे : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रजासत्ताक दिनी अनाथ व आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना भारतीय संविधानाचे वाटप करून देशाच्या भावी पिढीला संविधानाचे महत्व पटवून देण्याचा आगलावेगळा उपक्रम राबवला आहे. संविधान पुस्तिके सोबत ब्लॅंकेट देखील या प्रसंगी वाटप करण्यात आले.संविधानाच्या वाचनाने ही मुलं भविष्यातील जबादार अधिकारी व नागरिक बनतील अशी अपेक्षा यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केली.यावेळी कृष्ण प्रकाश यांच्यासोबत सतीश माने, मनिष कल्याणकर, चव्हाण व जोगदंड आदींची उपस्थिती होती.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अनाथ व आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना चॉकलेट,ब्लॅंकेट व संविधान पुस्तकांचे वाटप करून एक आगलावेगळा आदर्श घालून दिला आहे. यावेळी मुलांना संविधानाचे महत्व काय आहे हे देखील समजावून सांगितले. संविधानाच्या वाचनाने चांगला माणूस व चांगला भारतीय नागरिक बनतो. त्यामुळे संविधानाचे वाचन केलं पाहिजे आणि ते समजून घेतलं तर देश समजेल असं आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपले मत व्यक्त करत संविधानाचे महत्व पटवून दिले.तसेच लहान वयात मुलांनी संविधानाचे वाचन केलं तर भविष्यातील जबाबदार नागरिक बनतील व त्यामुळे गुन्हेगारीला आला बसेल असा विश्वास देखील कृष्ण प्रकाश यांनी यावेळी व्यक्त केला. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या आगळ्यावेगळ्या भेटीमुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
ConversionConversion EmoticonEmoticon