बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीची न्यायालयाबाहेर गोळ्या घालून हत्या

बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाची मुलीच्या पित्याने न्यायालयाच्या बाहेर गोळ्या घालून केली हत्या 
गोरखपूर : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या आरोपीची न्यायालयाच्या बाहेर गोळया घालून हत्या.अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला आरोपी न्यायालयाबाहेर वकिलाची वाट बघत असताना बलात्कार पीडित मुलीच्या पित्याने त्याच्याकडे परवाना असलेल्या बंदुकीतून आरोपीच्या डोक्यात गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली.पीडित मुलीचे वडील हे माजी सैनिक अहेत.उत्तर प्रदेशच्या गोरखपूर न्यायालयाच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.

 बलात्काराचा आरोप असलेला आरोपी न्यायालयच्या बाहेर असलेल्या पार्किंग मध्ये वकिलाची वाट बघत असताना ही घटना घडली आहे. नंतर आजूबाजूला असलेल्या लोकांनी गोळ्या झाडणाऱ्या 52 वर्षीय व्यक्तीला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले.सीमा सुरक्षा दलातील हा सेवा निवृत्त जवान असून तो आपल्या कुटुंबासोबत महाराजगंज या आपल्या गावी राहत आहे.या घटनेत मृत तरुण दिलशाद हुसेन हा मुळचा बिहार चा रहिवाशी असून तो या माजी सैनिकाच्या घरासमोर पंचरचे दुकान चालवत होता.

 दिलशादने 12 फेब्रुवारी 2020 रोजी माजी सैनिकाच्या 16 वर्षीय मुलीचे अपहरण केलं. त्यांनतर 17 फेब्रुवारी दिलशादच्या विरोधात मुलीच्या वडिलांनी पोलिसात बलात्काराची तक्रार दिली. त्यानंरत आरोपी दिलशादविरुद्ध पोक्शो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.परंतु मुलीच्या जबाबानंतर त्याच्यावरील बलात्काराचा गुन्हा काढून घेण्यात आला होता आणि त्याला नुकताच जमीन मिळाला होता.
Previous
Next Post »