दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्याने भाजपाच्या गोटात आनंद व्यक्त होत आहे.महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात अध्यक्षाच्या दालनात जाऊन गोंधळ केल्याने भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यासंबंधीचा निकाल आज लागला असून भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यामुळे भाजपाला मोठा दिलासा मिळाला असून भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
गेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान असंसदिय व असभ्य वर्तन केल्याच्या कारणावरून महाराष्ट्र सरकारने भाजपाच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित केलं होतं.सरकारने केलेल्या निलंबनाच्या कार्यवाहीच्या विरोधात निलंबित आमदार आशिष शेलार व इतरांनी सर्वोच्च न्यायालत धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती ए एम खानविलकर, न्या.दिनेश माहेश्वरी, न्या. सी. टी रविकुमार यांच्या खंड पीठात याचिकेवर सुनावणी झाली. सर्व युक्तीवाद मागच्याच आठवड्यात पूर्ण झाले होते.
मात्र या प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाचा निकाल जाहीर केला असून त्यात भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्याचे सांगिले आहे. त्यामुळे या निर्णयाने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.गेल्यावर्षी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा चालू असताना राजदंड उचलणे,माईक ओढणे तसेच अध्यक्षाच्या दालनात जाऊन तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव यांना धक्का बुक्की करणे शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे अशा प्रकारचे गैरवर्तन केल्याचा ठपका ठेऊन भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले होते.
कोण कोणते आमदार निलंबित केले होते
निलंबन केलेल्या आमदारामध्ये आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीष महाजन, पराग आळवणी, अतुल भातखळकर,संजय कुठे,योगेश सागर, हरीश पिंपळे जयकुमार रावल,राम सातपुते,नारायण कुचे आणि बंटी भांगडिया आदींचा समावेश होता.
ConversionConversion EmoticonEmoticon