तामिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यात रथ ओढताना बसला विजेचा धक्का ; 10 जनांचा मृत्यू तर 15 जन जखमी


तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात रथ उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून 10 जनांचा जागीच मृत्यू, तर 15 जन जखमी 

चेन्नई :
तामिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यातील कालिमेडू शहरात मंदिराचा रथ ओढत असताना विजेचा धक्का बसल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत 2 लहान मुलासाह 10 जनांचा मृत्यू झाला आहे तर 15 जन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.ही घटना बुधवारी 27 एप्रिल रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

तंजावूर जिल्ह्यातील कालिमेडू या शहरात दरवर्षी प्रमाणे भगवान अय्यप्पाचा उत्सव साजरा केला जातो.या उत्सवाला जवळपासच्या लोकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.मंदिराचा रथ ओढण्याचा साजरा केला जात होता.भाविक रथ ओढण्याच्या दरम्यान तो फिरवत असताना विजेच्या तारांना अडकल्यामुळे ही दुर्घटना घडली.या मध्ये 2 लहान मुलांसह 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
उत्सवा दरम्यान परिसरात सर्वत्र पाणी साचले होते.त्यामुळे विजेचा धक्का बसल्याने जवळपास 50 जन दूर फेकल्या गेले.दरम्यान अनेकांनी तिथून पळ काढल्याने मोठी जिवीत हानी टाळली. घटने संबंधी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास तिरुचिल्लापल्ली पोलीस करत आहेत. याबाबतची माहिती पोलीस अधिकारी व्ही. बाळकृष्णन यांनी दिली आहे.
Previous
Next Post »