नवी दिल्ली : देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय उमेश लळीत यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्र अध्यक्षा श्रीमती द्रौपदी मुरमुरे यांनी बुधवारी लळीत यांना नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली आहे.लळीत यांचा 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49 वे सर न्यायाधीश म्हणून शपथ विधी होणार आहे.
वर्तमान सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट रोजी संपणार आहे.त्यामुळे 27 ऑगस्ट रोजी न्या. उदय लळीत यांना 27 ऑगस्ट रोजी शपथ दिला जाणार असून ते त्याच दिवसापासून सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. लळीत यांचा कार्यकाळ पुढील तीन महिन्याचा असणार आहे.त्यांचा 8 नोव्हेंबर रोजी कार्यकाळ समाप्त होणार आहे.
न्या. उदय लळीत हे आजपर्यंत चे दुसरे सरन्यायाधीश असतील ज्यांना वकिलामधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंड पिठात स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी 1971 मध्ये एस ई-मेल सिक्री यांची सुद्धा अशाच पद्धतीने सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.न्या सिक्री हे मार्च 1964 मध्ये वकिलामधून थेट सरन्यायाधीश पदी नियुक्त झाले होते.
ConversionConversion EmoticonEmoticon