शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदे गटाची ; आज होणार सुप्रीमकोर्टात फैसला

शिवसेना कुणाची होणार? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी राहणार का? थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टाचा निर्णय 
शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरे की शिंदे गटाची याचा फैसला थोड्याच वेळात सुप्रीमकोर्टात होणार आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिबल यांनी बाजू मांडली तर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी बाजू मांडली. दोन्ही गटांच्या वकिलांचा युक्तिवाद काल पूर्ण झाल्यानंतर आज यावर निर्णय येणार आहे. सर न्यायाधीश एन . व्ही.रमणा, न्या. कृष्णा मुरारी व न्या. हिमा कोली यांच्या घटना पिठासमोर सुनावणी झाली.

आज पुन्हा दोन्ही गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर सुनावणी होणार असून शिवसेना कोणाची याचा निर्णय लागणार असल्याने सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यात काय राजकीय घडामोडी घडणार याची उत्सुकता राज्यातील तसेच देशातील लोकांना लागली आहे. दोन्ही घाटाचे वकील न्यायालयात हजर झालेले आहेत. शिवसेना कोणाची होणार  शिंदे मुख्यमंत्री म्हणून राहणार का की शिंदे घाटाचे आमदार अपात्र होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Previous
Next Post »