15 ऑगस्ट रोजी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहिर
मुंबई : राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी राज्यसरकारने मुख्यमंत्री कार्यालयातून गुरुवारी मंत्र्यांची यादी जाहिर केली आहे. ज्या जिल्ह्यात जे मंत्री 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करतील तेच त्या जिल्ह्याचे संभाव्य पालक मंत्री असतील असतील अशी माहिती आहे.उर्वरित जिल्ह्यात आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण करणार आहेत तर उपमुख्यमंत्री नागपूर येथे ध्वजारोहण करणार आहेत. उर्वरित 18 मंत्री हे खालील जिल्ह्यात ध्वजारोहण करतील.सुधीर मुनगंटीवर -चंद्रपूर, मंगल प्रभात लोढा - मुंबई उपनर,चंद्रकांत पाटील -पुणे,राधाकृष्ण विखे -अहमदनगर,गिरीश महाजन - नाशिक, दादा भुसे - धुळे, गुलाबराव पाटील - जळगाव, रवींद्र चव्हाण - ठाणे,दिपक केसरकर- सिंधुदुर्ग,उदय सामंत रत्नागिरी,अतुल सावे -परभणी,संदीपान भुमरे -औरंगाबाद,सुरेश खडसे -सांगली,विजयकुमार गावीत-नंदुरबार,तान्हाजी सावंत - उस्मानाबाद,शंभूराज देसाई -सातारा, अब्दुल सत्तार - जालना तर संजय राठोड - यवतमाळ या मंत्र्यांचा समावेश आहे.
उर्वरित जिल्ह्यामध्ये आयुक्त किंवा जिल्हाधिकारी हे 15 ऑगस्ट रोजी 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करतील.या वर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा 75 वा दिन असल्यामुळे त्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केलं आहे.हा महोत्सव 2023 पर्यंत साजरा केला जाणार आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon