अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन्ही भोंदूबाबांना अटक
नागपूर : अंगारे -धुपारे देऊन पूजा करण्याच्या बहाण्याने एका 17 वर्षाच्या मुलीवर दोन भोंदू बाबांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पूजा सुरु असताना अचानक मुलीचा मामा घरात आल्याने हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी दोन्ही भोंदू बाबांना सावनेर पोलिसांनी अटक केली असून मनोहर कोल्हे(वय 55 रा. हेटी ता.सावनेर ) व युवराज सोनटक्के (वय 40 रा.पहलेपार ता. सावनेर )अशी अटक केलेल्या भोंदू बाबांची नावं आहेत.बलात्कार पीडित मुलगी ही 17 वर्षाची असून अनेक दिवसापासून आजारी होती. मुलगी बऱ्याच दिवसापासून आजारी असल्याचे एका मंदिरात पुजारी असलेल्या युवराज सोनटक्के याला माहिती होती. त्यामुळे तो पीडित मुलीच्या घरी येऊन मनोहर कोल्हे महाराज यांच्याकडे पूजा करावी लागेल असे सांगितले. श्रद्धेपोटी पुजाऱ्यावर विश्वास ठेवून पीडित मुलीच्या दाम्पत्यांनी मनोहर कोल्हे याचे हेटी येथील घरी जाऊन भेट घेतली. तिथे अनेक मुलींची मनोहर कोल्हे पूजा करीत होता.
मुलीवर देवाची अवकृपा झाल्याने तिची अंगारे धुपारे देऊन रात्रभर पूजा करावी लागेल असे मनोहर कोल्हे यांनी पीडित मुलीच्या मामा मामीला सांगितले. ठरल्यानुसार 3 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता मनोहर कोल्हे याने मुलीला पूजा करण्यासाठी घरात नेले आणि पूजा रात्रभर चालणार असल्याने नातेवाईकांनी सकाळी यावे असे सांगितले.त्यानंतर युवराज सोनटक्के सुद्धा घरात गेला. नंतर मुलीचा मामा देखील तिथून निघून गेला.नंतर मनोहर कोल्हे आणि युवराज सोनटक्के या दोघांनी मुलीला अर्ध नग्न करून तिच्या अंगावर गुलाल फासला. दरम्यान दोन तासांनी मुलीचा मामा देवाचा हार देण्यासाठी आला असता दोन्ही भोंदू बाबा मुलीवर सामूहिक बलात्कार करत असल्याचे दिसून आले.मुलीच्या मामाला बघताच त्यानंतर दोन्ही भोंदूंनी तिथून पळ काढला.
घडलेल्या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या मामाने सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून दोन्ही आरोपी भोंदू बाबांना अटक करण्यात आली आहे.प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली रासकर करत आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon