Fake encounter : हैदराबादेतील 2019 मधील बलात्कार : आरोपिंचे बनावट एन्काऊंटर ; 10 पोलिसांवर खटला चालवण्याची आयोगाची शिफारस

बनावट

 एन्काऊंटर प्रकरणी 10 पोलिसांवर खटला चालवण्याची चौकशी आयोगाची शिफारस 
नवी दिल्ली : (fake encounter )हैदराबाद येथे 2019 मध्ये 'दिशा बलात्कार व हत्या' प्रकरणी आरोपिंचे बनावट एन्काऊंटर केले असल्याचे यासंबंधी स्थापन केलेल्या न्यायालयीन चौकशी आयोगाने स्पष्ट केलं आहे.या प्रकरणात  आरोपिंचा मृत्यू व्हावा याच उद्देशाने गोळीबार केला असल्याचा ठपका चौकशी आयोगाने पोलिसांवर ठेवला आहे.पोलिसांनी बनावट चकमक करून हत्या केल्या प्रकरणी 10 पोलिसांवर खटला चालवीण्यात यावा,अशी शिफारस चौकशी आयोगाने केली आहे.या प्रकरणी पुढील सुनावणी उच्च न्यायालयात करण्याचे नर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

हैदराबाद येथे 2019 मध्ये एका पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून त्यांना जिवंत जाळण्यात आले होते.या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपिंना अटक केली होती. परंतु आरोपिंना पहाटे 5 वाजता घटनास्थळी आणले असताना गोळया घालून एन्काऊंटर करून ठार केले होते.या एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्या नंतर माजी न्या.व्ही एस सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थपाना करण्यात आली होती.त्यानंतर या आयोगाने सविस्तर चौकशी करून सर्वोच्च न्यायालयात अहवाल सदर केला होता.

या चौकशी अहवालावर सरन्यायाधीश एन व्ही रमणा,न्या. सूर्यकांत व न्या.हिमा कोहली यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली होती.या प्रकरणाचा अहवाल सिलबंद ठेवावा अशी मागणी जेष्ठ विधिज्ञ श्याम दिवाण यांनी केली. मात्र, हे प्रकरण चकमकीचे आहे असे सांगत ती मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

याप्रकरणी आयोगाने नोंदवलेलं निरीक्षण -
मृत्यू होईल याच हेतूने आरोपिंवर गोळीबार करण्यात आला होता.
चारपैकी तीन आरोपी अल्पवयीन.तपासात अनेक त्रुट्या होत्या.
आयोगामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्या. रेखा बाल्दोडा आणि सीबीआयचे माजी संचालक डी आर कार्तिकेयन यांचा समावेश होता.
Previous
Next Post »