मुंबई : मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरु करण्याबाबतीत पालकांचा दबाव वाढत असल्याने सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून मुंबई सोबत 8 महानगर पालिका क्षेत्रात सोमवार पासून शाळा सुरु होणार अहेत.परंतु सोमवार पासून राज्यात सर्वत्र शाळा सुरु होणार नाहीत. नागपूर आणि पुणे यासह अनेक महापालिका आणि स्थानिक प्रशासन शाळा व महाविद्यालय सुरु करण्यास तयार नाहीत.आठवडाभरात परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.तसेच नागपूर मध्ये देखील 26 जानेवारी नंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा महाविद्यालय सुरु केले जातील.
मुंबई विभागातील सर्वच शाळा सोमवार पासून सुरु होणार आहेत.ठाणे जिल्ह्यातील 6 महापालिका 2 नगरपालिका आणि 2 नगर पंचायतीसह ग्रामीण भागातील 2728 शाळा सुरु होणार आहेत.अकोला आणि नाशिक जिल्ह्यात देखील सोमवार पासून शाळा महाविद्यालय सुरु होणार अहेत.परंतु मागापासलिक क्षेत्रातील शाळा महाविद्यालय 1 फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोण कोणत्या जिल्ह्यातील शाळा कधी सुरु होणार
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शाळा महाविद्यालय आठवड्यानंतर सुरु होण्याची शक्यता. नागपूर च्या बाबतीत अजून निर्णय झालेला नाही. कोल्हापूर 25 जानेवारी पासून, सांगली, मिरज,कुपवाडा 31 जानेवारी पासून. सोलापूर शाळा सुरु करण्याच्या संबंधाने शुक्रवारी बैठक, वसई -विरार 27 जानेवारी पासून,चंद्रपूर साठी उद्या बैठक आणि अकोला 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरु होणार.
ConversionConversion EmoticonEmoticon