पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी पथकाने हल्लेखोरांना पकडून अवळल्या मुसक्या, आरोपिंनी दुकानात घुसून धारदार शस्त्राने हल्ला करत लुटले होते कपडे
पुणे : चिखली परिसरातील पीसीएमसी फॅशन हब या कापड दुकानात घुसून अज्ञातांनी दुकान मालक असलेल्या महिलेवर आणि दुकानातील कामगारांवार धारदार शस्त्राने हल्ला करत काही कपडे घेऊन फरार झाले. ही घटना 31मार्च रोजी रात्री 9:15 वाजता घडली होती.अज्ञात हल्लेखोर तोंडाला मास्क बांधून दुकानात घुसले. त्यांनी अचानक दुकानातील कामगारांवार चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दुकानची मालक असलेली महिला समोर येताच त्यांच्यावर देखील हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात दुकान मालकीण असलेल्या महिलेच्या नाकावर घाव लागला.
त्यानंतर हल्लेखोर दुकानातील काही कपडे घेऊन फरार झाले.घटनेची माहिती पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सीसी टीव्ही फूटेज च्या आधारे पाचही हल्लेखोर आरोपिंना पकडून मुसक्या अवळल्या आहेत. हल्लेखोरापैकी तिघे अल्पवयीन असल्याचे पोलीस सहआयुक्त पद्माकर घनवट यांनी सांगितले आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली शस्त्र विरोधी पथकाचे सा.पो.उपनिरीक्षक भरत गोसावी, सा.पो.उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे, सा. पो. उपनिरीक्षक शामराव शिंदे, पो. हवालदार चंद्रकांत गवारी, पो. हवालदार प्रीतम वाघ, पो.ह. नामदेव वडेकर, पो. ह. वसीम शेख, पो.कॉ मोसीन आत्तार व पो कॉ प्रवीण मुळीक यांनी ही कार्यवाही केली.
आरोपिंना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon