BJP खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा दारुविषयी अजब सल्ला, कमी प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे आयुर्वेदात सांगितलं असल्याचे अजब विधान केलं आहे.
भोपाळ : खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांनी दारू पिणे आरोग्यासाठी योग्य असल्याचे अजब विधान केलं आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी नविन उत्पादन शुल्क धोरण जाहीर केलं आहे.नव्या उत्पादन शुल्क धोरणामुळे राज्यात दारूचे दर कमी होणार अहेत.त्याची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिल पासून सुरु होईल.राज्यात दारुवर बंदी आणण्याची भाजपाची मागणी होती आणि त्याबाबतीत सर्वात आधी दारू बंद करण्याची मागणी साध्वी प्रज्ञा सिंह यांनीच केली होती.परंतु भाजपासरकारने दारूबंदी करण्याऐवजी दारू स्वस्त करण्याचं धोरण राज्यात आणलं आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या दारू विषयी आणलेल्या नव्या धोरणबाबत खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी अजब विधान केलं आहे. कमी प्रमाणात दारू पिणे चांगले असते. कमी प्रमाणात दारू पिणे आयुर्वेदत आरोग्यासाठी चांगले असल्याचे लिहले असल्याचे अजब विधान खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलं आहे.
स्वतःला साध्वी समजणाऱ्या कट्टर हिंदुत्वादी माणल्या जाणाऱ्या आणि लोक प्रतिनिधी असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अशा प्रकारे विधान करणे कोणत्या संस्कृतीत बसणारे आहे. मुळात साधू संतांनी दारू पिणं चांगलं असतं असं म्हणणेच साध्वी या नावाला शोभाणारं नाही. साधू संतांना दारुविषयी एवढी माहिती कशी. आणि तेही आयुर्वेदाचा हवाला देऊन सांगणे की कमी प्रमाणात दारू पिणं आरोग्यासाठी चांगलं असते. मुळात दारू कमी किंवा जास्त पिणे योग्यच नाही. तरी पण स्वतःला साध्वी समजणाऱ्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर कमी प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी योग्य असल्याचे सांगतात. हे मात्र अजबच आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon