उणी - धुणी करण्यापेक्षा केंद्रातून निधी आना असा सल्ला अजीत पवार यांनी नारायण राणे यांना दिला आहे
सिंधुदुर्ग : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली.याबद्दल प्रतिक्रिया देताना अजीत पवार म्हणले की सिंधुदुर्ग जिल्हाबँकेच्या निवडणुकीत दुर्दैवाने महाविकास आघाडीला यश मिळालं नाही. ज्यांना यश मिळालं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी ही बॅंक चांगल्या रीतीने चालवावी अशा शुभेच्छा देतो असं अजीत पवार यांनी आज प्रतिक्रिया देतानी म्हटलं आहे.जिल्हाबँकेच्या निवडणुकीसाठी अर्थमंत्री येऊनही काही फरक पडला नाही असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजीत पवार म्हणले की नारायण राणे हे केंद्रात मंत्री अहेत.त्यांनी एकमेकांची उणी धुणी काढण्यापेक्षा केंद्रातून विकास निधी आणावा. आम्ही कोकणच्या विकासाठी राज्यातून निधी उलब्ध करून देऊ.सर्वांनी मिळून कोकणचा कायापालट करू असं अजीत पवार यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे आज पुणे जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान होत असून महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्रित पणे लढत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणूकीडे लागले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon