राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचा महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र निषेध
मुंबई : मुंबईतील एका कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी भाषण करत असताना त्यांनी गुजराती आणि राजस्थानी लोक महाराष्ट्रातून गेल्यास महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त विधान केलं. राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधाणामुळे राज्यात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. राजकीय, सामाजिक व सामान्य नागरिकांकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया येत असून राज्यभर निषेध केला जात आहे.राज्यपालाकडून शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,शाहू महाराज व महाराष्ट्राची उभारणी करणाऱ्या तमाम मराठी माणसांचा अशा प्रकारे अपमान करणे हे राज्यपालांना शोभत नाही. ते राज्यपाल आहेत की राजकीय नेते.याबाबत भाजपाने स्पष्टीकरण द्यावे अशी मराठी माणसांची मागणी आहे.
भगत सिंह कोश्यारी हे राज्यपाल नसून भाजपाचे नेते असल्याचे वागत आहेत. ते जेथून आलेत तिथे त्यांना पाठवावे अशा तीव्र प्रतिक्रिया मराठी माणसाकडून व्यक्त केल्या जात आहेत.
महाराष्ट्रात सर्वच स्थारातून राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा विरोध होत असल्याचे पाहून भगत सिंह कोश्यारी यांनी सार्वसारव करत मराठी माणूस देखील महत्वाचा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. खरंतर भगत सिंह कोश्यारी हे भाजपाची भाषा बोलत आहेत. ते आरएसएस व भाजपाचे निष्ठावान असल्याने त्यांच्या तोंडून अशा प्रकारची वक्तव्य येणारच. परंतु महाराष्ट्र अशा प्रकारचा अपमान सहन करणार नाही.महाराष्ट्राची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल यात तीळ मात्र शंका नाही.
ConversionConversion EmoticonEmoticon