चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील टिळक नगरात मानवी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची धक्का दायक घटना घडली आहे.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे.पोलिसांनी नराधमा विरोधात गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली आहे.
शहरातील टिळक नगरात हे कुटुंब राहत असून त्यांना 12 वर्षाची एका मुलगी आहे. या मुलीवर तिचे वडील याची वाईट नजर होती. त्याने 29 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता मुलीवर वडिलांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या प्रकारची पीडित मुलीच्या आईने ब्रहपुरी पोलीस ठाण्यात आपल्या पती विरोधात तक्रार दिली आहे.
या नराधम वडिलाने यापूर्वी 2020 मध्ये सुद्धा मुलगी स्वयंपाक घरात झोपली असता मध्यरात्री खोलीत प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला होता.पीडित मुलीच्या आईला जाग आली आणि पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता वडील संशयित रित्या तिथे दिसून आल्याने तिला शंका आली. त्यामुळे मुलीला विचारपूस केली. तेव्हा मुलीने सांगितले की तिच्यावर जबरजस्ती करण्यात आली म्हणून.
परंतु बदनामी होईल म्हणून घरातील गोष्ट बाहेर जाऊ द्यायची नाही असे ठरवून पोलिसात तक्रार दिली नव्हती. परंतु निर्दयी बापाच्या वागण्यात कुठलाच बदल झाला नाही. त्याने पुन्हा 29 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता 12 वर्षाच्या आपल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात आपल्या पती विरोधात तक्रार दिली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon