व्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी ; लोकशाहीसाठी घातक

व्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी भारतीय लोकशाहीसाठी घातक बाब 
मुंबई : सनातनी वर्चस्ववाद्याकडून व्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत आहे. ही लोकशाही साठी घातक बाब आहे.एखाद्या व्यक्ती ने सोसिअल मीडियावर आपले विचार केले तर त्यावक्तीला नौकरी किंवा ती व्यक्ती करत असलेल्या कामावरून काढून टाकणे ही बाब खरोखरचं भारतीय लोकशाहीला घातक आहे.कोणी काय बोलावं,  कोणी काय खावं,कोणी कोणते कपडे घालावे यावरसुद्धा भविष्यात बंधने घातले जाऊ शकतात.

दोन दिवसापूर्वी असाच प्रकार घडला तो म्हणजे स्टार प्रवाह या मराठी टीव्ही वरील मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेते किरण माने हे 'विलास पाटील' म्हणून भूमिका साकारतात. या मालिकेतील भूमिका ते अतिशय जीव ओतून निभावत असल्यामुळे प्रेषकांना विलास पाटील हे पात्र खूप आवडलेलं आहे. परंतु त्यांना आता मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यांना या भूमिकेतून  काढून काटाकलं? याचं नेमकं करणं काय? तर अभिनेते किरण माने (विलास पाटील )यांनी फेसबुक वर पोस्ट लिहिली होती. त्या पोस्ट मध्ये त्यांनी त्यांचे विचार मांडले होते.

त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिलं होतं की आमच्या समोर दोन जरी प्रेषक बसलेले असले तरी आम्ही जीव ओतून भूमिका निभावतो. या पोस्ट मध्ये कोणाचेही सामाजिक धार्मिक किंवा राजकीय भावना दुखावल्या नाहीत.टीव्ही चॅनेलला किंवा मालिका चालवणाऱ्या प्रोडक्शन हाऊसला याचा आक्षेप नाही. परंतु किरण माने हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे असून सनातनी व्यवस्थेच्या विरोधात प्रखडपणे आपले विचार मांडणारे अहेत.

 सनातनी विचारधारेच्या एका महिलेनं प्रोडक्शन कडे तक्रार केली आणि सनातनी व्यस्थेच्या दबावाला बळी पडून 'मुलगी झालो हो' या मालिकेच्या प्रोडक्शन हाऊस कडून किरण माने यांना 'विलास पाटील' या भूमिकेतून हटवण्यात आलं आहे.छोट्या पडद्यावरील फिल्म इंडस्ट्री, मोठ्या पडद्यावरील फिल्म इंडस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक टीव्ही मीडिया यांच्यावर सनातनी वर्ण व्यवस्थेचे वर्चस्व  असल्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कट दाबी केली जात आहे. अशाप्रकारची मुस्कटदाबी भारतीय लोकशाहीला घातक आहे एवढं मात्र नक्की आहे.
Previous
Next Post »