राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्याबाबत भाषण केलं होत. त्यानंतर ठाण्यातील सभेत 3 मे पर्यंत मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्याचा अल्टीमेटम राज्य सरकारला दिला. त्याच पार्शवभूमीवर औरंगाबाद येथे जाहीर सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. राज ठाकरे हे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याच्या कारणावरून अनेक सामाजिक व राजकीय पक्ष संघटनांनी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला विरोध दर्शवला होता.
धार्मिक तेढ निर्माण होणार आणि त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार अशा प्रकारचे भडकावू अथवा चीथावनी खोर भाषण करू नये यासाठी 16 आटी घालून पोलीस प्रशासनाने घालून सभेला परवानगी दिली होती. मात्र सभेमध्ये पोलिसांनी घालून दिलेल्या कोणत्याच आटिंचे पालन करण्यात आले नाही. उलट 4 मे नंतर मस्जिवरील भोंजे सरकारने काढले नाही तर आम्ही ते भोंगे काढू असा ईशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात धार्मिक दंगली करण्याचा आणि राज्याची कायदा व्यवस्था कमजोर करून राज्य सरकार अस्थिर करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे.
राज ठाकरे यांना राज द्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होणार का?
ज्या कायदा व्यवस्थेच्या कारणास्तव खा.नवनीत राणा आमदार रवी राणा यांना राज्य सरकारने राज द्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून तुरुंगात टाकले आहे.जर देशातील कायदा सर्वांसाठी सारखाच आहे.तर मग राज ठाकरे यांना राज द्रोहाच्या गुन्ह्याखाली का अटक केली जाऊ शकत नाही. राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंधू असल्यामुळे त्यांच्यावर "राज" द्रोहाचा गुन्हा दाखल करणार का? किंवा त्यांच्यावर थातूर मातुर गुन्हे नोंद करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करणार हे येत्या काही तासात राज्यातील आणि देशातील जनतेला कळेलच.
संपादकीय....
ConversionConversion EmoticonEmoticon