मोदीसरकारने इंधन दर कपातिचा घेतलेला निर्णय देशातील जनतेला दिलासा देणारा, मात्र पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे.
केंद्रातील मोदीसरकारने इंधन दर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन दरात झालेली प्रचंड वाढ देशातील जनतेला हैराण करणारी आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस,सीएनजी या दैनंदिन अत्यावशक पदार्थाची झालेली भरमसाठ भाव वाढ जनतेला पेलवणारी नाही. अनेक महिन्यापासून साततत्याने होणाऱ्या इंधनदर वाढीमुळे जनता त्रस्त झाली आहे.
अनेक महिन्यानंतर केंद्रातील मोदी सरकारला जाग आली आहे.दिवाळी भेट म्हणून सरकारने इंधन दर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दर कपातीचा निर्णय जनतेला आर्थिक बाबतीत दिलासा देणारा आहे मात्र ही इंधन दर कपात केवळ देशातील जनतेच्या हितासाठी घेतलेला निर्णय नसून पुढील वर्षी होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर घेतलेला आहे.
इतक्या दिवसापासून देशातील जनता साततत्याने वाढणाऱ्या इंधन दर वाढीचा आर्थिक भार सहन करत होती तेंव्हा मोदीसरकारला दिसले नाही का? परंतु जसं जशी उत्तर प्रदेश आणि पंजाबची विधानसभा निवडणूक जवळ येत आहे हे लक्षात घेऊन मोदी सरकारने इंधन दर कपातीचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकार च्या सोबत भाजपा प्रणित राज्यातील सरकारने देखील इंधन दर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.या अगोदर भाजप शासित राज्यातील सरकारने हा निर्णय का घेतला नाही. केंद्र सरकारने दर कपात करण्याचा निर्णय घेतल्या नंतरच या सर्वांना कशी जाग आली.
केंद्र सरकारने इंधन दर कपाती संदर्भात घेतलेला निर्णय राजकीय हेतू साध्य करण्यासाठी असला तरी या निर्णयामुळे देशातील जनतेला काहीसा दिलासा मात्र नक्की मिळाला आहे.इंधन दर कपात केल्याने पेट्रोल दरात किमान दहा रुपये तर डिझेलचे दर पंधरा रुपये पर्यंत कमी होणार आहेत
ConversionConversion EmoticonEmoticon