पुरोगामी महाराष्ट्रात जात पाहून घर नाकारण्याचा प्रकार ; बांधकाम व्यवसायिकाविरोधात ऍट्रॉसिटी ऍक्ट अनुसार गुन्हा दाखल

औरंगाबाद मध्ये जातविचारून घर नाकारणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाविरोधात ऍट्रॉसिटी ऍक्ट अनुसार गुन्हा दाखल 
औरंगाबाद : पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आज ही जात पाहून घर देण्याचे नाकारले जाते. फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या महाराष्ट्रासाठी शरमेची गोष्ट आहे.औरंगाबाद शहरात सिडको भागात रहिवासी असलेले ऍड.महेंद्र गंडले यांच्या सोबत घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. कायद्याने जातीभेद करणे गुन्हा असला तरी सर्रास पणे जातीवादला खतपाणी घातले जात असल्याचे आपण नेहमी पहातो.

राजकीय स्वार्थ साधण्यासाठी केवळ पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या नावांचा वापर करायचा. आजकाल तर सर्व राजकीय पक्षांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयजयकार करण्याची चढाओढ सुरु झाली आहे. एका बाजूला राजकीय मंचावरून फुले शाहू आंबेडकर यांचे गुणगान करायचे आणि दुसऱ्या बाजूला जातीला खतपाणी घालायचं सर्रास पाहायला मिळते.

कायद्याने जातीवादाला आला घातलेला असला तरी वास्तविक चित्र वेगळं आहे. खेड्यापाड्यात जितक्या प्रमाणात जातीवाद होतो त्याही पेक्षा जास्त जातीवाद शहरात होतोय. ग्रामीण भागात सवर्णच्या वस्तीत कोणी भाड्याने किंवा विकत घर घेत नाहीत. त्यामुळे तिथे घर देण्यावरून जातीवाद दिसून येत नाही. मात्र राजकीय दृष्टिकोनातून जातीवाद सर्रास पणे होतो. एखाद्या पक्षाला किंवा पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीत मत न दिल्याने मागासवर्गीय वस्तीवर बहिष्कार टाकणे, दळणवळण बंद करणे, शेतात कामाला न ठेवणे, शेतातून जाऊ न देणे, वाहन प्रवास बंद करणे अशा प्रकारे जातीवाद केला जातो.

परंतु शहरी भागात भाड्याने किंवा विकत घर देण्यावरून जातीभेद केला जातो. शहरात शिक्षणासाठी येणारे मुलं किंवा इतर लोक भाड्याने घर घेण्यासाठी विचारपूस केली जाते तेव्हा घरमाकांकडून भाडेकरूला त्यांची जात विचारली जाते.भाडेकरू जर बौद्ध किंवा मागासवर्गीय असेल तर त्यांना घर नाकारले जाते हे वास्तव आहे.तो प्रकार औरंगाबाद येथील रहिवाशी ऍड.महेंद्र गंडले यांच्या सोबत घडला आहे.

हिरापूर येथील भाईश्री ग्रुपचे भूमी विश्वबन याठिकाणी असलेल्या रो-हाऊस मध्ये घर बुक करण्यासाठी गंडले दामपत्य गेले असता त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी गंडले यांची जात विचारली. ऍड. महेंद्र गंडले यांनी मी बौद्ध आहे सांगितसल्या नंतर त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी घर दाखवण्यास टाळाटाळ करून तुम्हाला घर देतायेणार नाही असं सांगितले.

त्यामुळे अपमानित झालेल्या ऍड. महेंद्र गंडले यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन भाईश्री ग्रुपचे मालक सोमाणी, मकरंद देशपांडे आणि जैन तसेच बांधकाम साईट असलेले कर्मचारी योगेश निमगडे आणि सागर गायकवाड व इतरांविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.भाईश्री ग्रुप च्या सर्व भागीदार मालकाविरोधात ऍट्रॉसिटी कायद्यानुसार कार्यवाही केली जावी आणि बांधम व्यावसायिक म्हणून असलेला परवा रद्द केला पाहिजे आणि भविष्यात पुन्हा यांना कुठल्याही नविन नावाने परवाना देण्यात येऊ नये तरचं भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल.
Previous
Next Post »