गुजरातच्या भचाऊ येथील नेर गवातील दलित परिवार राम मंदिरात दर्शनासाठी गेल्याने जातीवाद्याकडून गंभीर मारहाण, गाडी व मोबाईलची मोडतोड करण्यात आली.
गुजरात : राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका दलित परिवाराला बेदम मारहाण करून रक्त भंबाळ करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्त दैनिक भास्कर ने 31ऑक्टोबर रोजी प्रसिद्धीस दिले आहे.सदरील घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली असल्याचे भचाऊ पोलिसांनी सांगितले आहे. भचाऊ येथील नेर गावात ही घटना घडली आहे.नेर गावात राम मंदिरात राम प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच गवातील एक दलित कुटुंब रामाचे दर्शन घेण्यासाठी राम मंदिरात गेले होते.
परंतु हे कुटुंब दलित असल्यामुळे मंदिरात का आले या कारणावरून त्या दलित परिवाराला जातीवाद्याकडून गंभीर अशी मारहाण करून रक्त भंबाळ करण्यात आले. एवढेच नाही तर त्या परिवाची गाडीची तोडफोड केली, त्यांचे मोबाईल सुद्धा हिसकावून घेतले आहेत.पीडित परिवाराच्या घरावर ही हल्ला केला आहे. अनेक वस्तूंची मोडतोड करण्यात आली आहे. या प्रकरणी 17 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच आरोपीना अटक करण्यात आली असून आणखी 12 जन फरार आहेत. फरार आरोपीचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दासाद विधानसभेचे काँग्रेस आमदार नौशाद सोळंकी यांनी या घटनेचा विडिओ वायरल केल्यामुळे हे प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणी पोलीस काय कार्यवाही करणार हे दिसून येईलच.
मंदिरात गेल्यामुळे दलितांना मारहाण झाल्याचे असे अनेक प्रकरण पहात आलो आहोत.दलित परिवारातील नवरदेव घोड्यावर बसल्याने मारहाण झालेलेली आहे. नवरदेव दर्शनासाठी मंदिरात गेल्याने नवरदेव व त्याच्या परिवाराला जातीवाद्याकडून मारहाण झाल्याचे आपण कित्येकदा पहातो.भारतातल्या स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या दलितांना अशीच वागणूक मिळणार आहे.गर्वसे कहो हिंदू हैं म्हणणाऱ्या दलितांची अशीच अवस्था असणार आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 6 डिसेंबर 1956ला हिंदू धर्माचा त्याग करून विज्ञान वादी धम्माचा स्वीकार केला.हिंदू धर्मात राहून हिंदू प्रमाणे समान दर्जा मिळत नाही म्हणून तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माला सोड चिट्ठी दिली.त्यामुळे जे लोक बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानतात ते बौद्ध झालेत आणि ते मंदिरात जात नाहीत. त्यांना कोणी मारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
ConversionConversion EmoticonEmoticon