प्राधानमंत्री कार्यालताच 26 टक्के रिक्त पदं असल्यामुळे रोजगाराच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर जोरदार टिका केली आहे
नवी दिल्ली : रोजगाराच्या मुद्यावरून राष्ट्रवादीने प्रधानमंत्र्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सबका साथ सबका विकास "अबकी बार मोदी सरकार"चा नारा देऊन वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याच्या प्रधानमंत्री मोदींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत कोट्यावधी तरुण रोजगाराच्या शोधत वणवन भटकत असल्याची टिका केली आहे. रोजगाराच्या मुद्यावर बोलताना प्रधानमंत्री कार्यालयातच 26 टक्के पदं रिकामी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.त्यामुळे येत्यानिवडणुकीत मोदींना विरोधी बाकावर बसविल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा ईशाराही राष्ट्रवादीने दिलेला आहे.निवडणुकीच्या तोंडावर कोटीने रोजगाराच्या बातम्या दिल्या जात अहेत.परंतु मोदीजी भरती कधी करणार? 2014 च्या मोदी लाटेची लोकांच्या डोक्यात आधीच तीव्र सनक भरलेली आहे.आबाकी बार मोदी सरकार चा नारा देऊन वर्षाला 2 कोटी तरुणांना रोजगार देऊ असं आश्वासन दिलं होतं. मोदीजींच्या भुलथापांना बळी पडलेले तरुण रोजगाराच्या शोधत अजूनही वनवन भटकत अहेत.याबत एन.डी टीव्हीने एका बातमीत केंद्र सरकारच्या रोजगार नितीचा भंडा फोड केला असून देशातील जनतेसमोर सर्व लेखा जोखा मांडला आहे. त्यात एकट्या प्रधानमंत्री कार्यालयातच 26 टक्के पदं रिकामी असल्याचे उघड झाले आहे.
2020 मार्च पर्यंत केंद्र सरकार मध्ये एकूण 8.72 लाख पदं रिकामी अहेत म्हणजे 26 टक्के पदं केंद्र सरकाने भरली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.रेल्वे, गृहमंत्रालय,विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय त्याच बरोबर प्रधानमंत्री कार्यालतील देखील 26 टक्के पदं रिकामी अहेत.ही पदं केंद्र सरकारने भरली नसल्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात तरुणांचा रोष असणार आहे.भरले जात असणाऱ्या पदांसाठी 3 वर्षाचा कालावधी लागतो.
तसेच कर्मचारी निवड आयोगाने 2018 साली 60 हजार पदांची भरती जाहीर केली होती परंतु प्रत्यक्ष मात्र 55 हजार पदं भरली गेली त्यात अजूनही 5 हजार पदं भरली नाहीत. अशा प्रकारे जर काम चालू असेल तर पूर्ण भरती होण्यासाठी तरुणांच्या 2-3पिढ्या निघून जातील असं देखील राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon