लातूर मध्ये बाप लेकीला हायवा ट्रकने चिरडले ; दोघांचाही जागीच मृत्यू

लातूर जिल्ह्यातील बाभळगाव नाका परिसरात हायवा ट्रॅकने चिरडल्याने दुचाकीवरील बाप लेकीचा जागीच मृत्यू 
लातूर : लातूर जिल्ह्यातील शिवणी-पेठ येथून शाळकरी मुलीला घेऊन दुचाकीवरून लातूरकडे येत असताना हायवा ट्रकने चिरडल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी बाभळगाव नाका परिसरात घडली आहे.या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवणी-पेठ येथील रहिवाशी दत्तात्रय कोंडीबा पांचाळ  (38) हे जिल्हा परिषद शिक्षक असून मुलगी प्रतीक्षा दत्तात्रय पांचाळ (13) ही इयत्ता 8 वीत शिकत होती. दत्तात्रय पांचाळ हे आपल्या मुलीला दुचाकी वरून (एमएच 24 बीएच 4109) दर रोज जिजामाता विद्यालयात आणून सोडत होते. आज सोमवारी सकाळी नेहमी सारखं दुचाकीवरून मुलीला सोडण्यासाठी येत असताना बाभळगाव नाका परिसरात भरधाव हायवा ट्रकने या दोघांना चिरडले. या भीषण अपघातात बाप किकीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटने नंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत अहेत. विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng