एलपीजी गॅस दरात आणखी वाढ ; घरगुती गॅस 3.50रुपये तर व्यावसायिक गॅस 8 रुपयांनी वाढला


एलपीजी गॅस दरात आणखी वाढ, सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक चिंतेत वाढ 
एलपीजी गॅस दरात वाढ करत गॅस कंपन्यानी सर्वसामान्य नागरिकांना धक्का दिला आहे. आधीच आर्थिक तांचाईचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना गॅस कंपन्यानी दरवाढ करत आणखी झटका दिला आहे.गुरुवारी एल पी जी गॅस कंपन्यानी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. घरगुती गॅस 3.50 रुपये तर व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 8 रुपयांनी महागले आहे.

गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे देशात सर्वच ठिकाणी घरगुती एलपीजी सिलेंडरचे भाव 1000 च्या पार गेले आहेत.नवीन वाढलेल्या किंमतीनुसार आता दिल्ली मध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1003 झाली आहे. तर कोलकत्ता येथे घरगुती सिलेंडरची किंमत 1029 एवढी झाली आहे.चेन्नईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1018 एवढी आहे.

गॅस दरवाढीमुळे आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 2354 रुपये झाली आहे तर कोलकत्ता 2454 रुपये, मुंबई 2306 रुपये आणि चेन्नई 2507 रुपये प्रती सिलेंडर झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 7 मार्च रोजी 10 रुपयांनी घट झाली होती. मात्र,8 मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.1 मे रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर च्या किंमतीत 102.50 रुपये वाढ करण्यात आली होती.
Previous
Next Post »