वर्दीतील पोलिसांनी दाखवली माणुसकी ; सोलापूर रेल्वे स्थानाकात प्रसूतीच्या वेदना होत असलेल्या महिलेला तात्काळ दवाखान्यात केलं दाखल, महिलेची सुखरूप झाली प्रसूती

महिलेला प्रसूतीच्या वेदना होत असताना खाकी वर्दीतील देवदूतानी केलेल्या मदतिमुळे महिलेचा जीव वाचला असून सुखरूप प्रसूती झाली.
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर कालवाडी - सोलापूर  हीडेमो रेल्वे गाडी सकाळी 10 वाजता फ्लॅट क्रं - 5 वर आली असता एका महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. ही बाब रेल्वे पोलिसांच्या लक्षात येतात त्या महिलेला स्ट्रेचर व घेऊन ताबडतोब ऍम्ब्युलन्स बोलावून दवाखान्यात दाखल करण्यात आले. खाकी वर्दीतील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे महिलेला वेळीच उपचार मिळून सुखरूप प्रसूती झाली.महिलेने एका गोंडस अशा मुलीला जन्म दिला असून दोघेही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

कलबुर्गी येथून सोलापूरला जाण्यासाठी जयश्री जाधव नमक महिला आपल्या कुटुंबासोबत निघाली होती. सोलापूर रेल्वे स्थानकावर गाडी येऊन थांबली असता अचानक जयश्री जाधव या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. महिला वेदनेने किंचाळत असताना ही बाब लोहमार्ग पोलिसांना कळली. ड्युटीवर असलेल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ स्ट्रेचर वर त्या महिलेला घेऊन ऍम्ब्युलन्स बोलावली व दवाखान्यात दाखल केलं. खाकी वर्दीतील पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकी मुळे महिलेचा व तिच्या बाळाचा जीव वाचला.

हा सर्व घटना क्रम रेल्वे स्थानकातील सीसी टीव्हीत कैद झाला असून प्रल्हाद चव्हाण, दीपक साळवी,विशाल कुलकर्णी,बालाजी नाबदे या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे गरोदर महिलेस मदत मिळाली.त्यामुळे महिलेची सुखरूप प्रसूती होऊन मुलीला जन्म दिला आहे. या पोलिसांनी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng