मुंबईत ताडदेवमधील कमला इमारतीला आज ; 2 जनांचा मृत्यू, 15 जखमी


मुंबईतील ताडदेव येथील 20 मजली कमला इमारतीला लागलेल्या आगीत 2 जनांचा मृत्यू झाला तर 15 जन जखमी झाल्याची घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली 

मुंबई :
मुंबईतील ताडदेव येथील बहुमजली कमला इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत  2 जनांचा मृत्यू झाला तर 15 जन जखमी झाले अहेत.20 मजली असलेल्या कमला इमारतीमधील 18 व्या मजल्यावर सकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली.आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून इमारतीमधील सर्वांना सुख रूप बाहेर काढण्यात आले आहे.दरम्यान या घटनेत 2 जनांचा मृत्यू झाला असून 15 जन जखमी झाले असल्याची माहिती मुंबई मनपाने दिली आहे.

कमला इमारतीला कागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अहेत.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थानिक आमदार मंगल प्रसाद लोढा घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत 6 वृद्धांना ऑक्सिजन ची आवश्यकता असल्याने त्यांना ताबडतोब जवळच्या भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.या दुर्दैवी घटनेत 2 जनांचा मृत्यू झाला असून 15 जन जखमी झाले असून ही दुर्दैवी घटना असल्याचे आमदार मंगल प्रसाद लोढा यांनी सांगितले आहे.
Previous
Next Post »