शिवसेना आपलीच आहे हे सिद्ध करण्यासाठी ठाकरे पुरावे सादर करणार का? उद्धव थकरेंच उत्तर..

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुखतीत उद्धव ठाकरे यांनी दिले सडेतोड उत्तरं 
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने मोठं बंड केलं आणि खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न आता कळीचा मुद्दा बनला आहे. या शिवसेनेतील घडामोडी नंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे मैदानात उतरले आहेत.राज्यभर दौरे करून सभा घेऊन शिवसैनिकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे.दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आता उघडपणे भाष्य केलं आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. शिवसेना आपलीच आहे हे सिद्ध करायला ठाकरे पुरावे देणार का? या संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की माझा अजूनही देशाच्या घटनेवर भरोसा आहे,कायद्यावर भरोसा आहे.

चोऱ्यामाऱ्या सगळीकडंच चालतात असं माझं अजिबात मत नाही.मी जे म्हटले की सत्यमेव जयते. नाहीतर हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि दोन वाक्य करावी लागतील,एकतर असत्यमेव जयते आणि दुसरं वाक्य म्हणजे सत्तामेव जयते.सत्तामेव जयतेपुढे घेऊन तुम्ही काही करणार असाल तर लोकं ते खपवून घेणार नाहीत.लोक निवडणुकांची वाट पहात आहेत.आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही.लोक म्हणतात निवडणुका येऊ द्या त्यांना पुरूनच टाकू".

शिवसेना आणि संघर्ष एकमेकांच्या पाचवीला पूजलेले.शिवसेना ही तळपती तलवार म्यानात ठेवली तर गंजते.त्यामुळे ती तळपलीच पाहिजे आणि तळपणं म्हणजे संघर्ष आलाच.जिथे अन्याय तिथे वाघ हे शिवसेनेचे ब्रीदवाक्यच आहे.सध्या शिवसेनेवर वादळ आल्याचा आभास निर्माण केला जातोय. वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतोच. तो पाला पाचोळा सध्या उडतोय. एकदा तो पाला पाचूळा खाली बसला की सगळं खरं दृश्य समोर येईल.असं उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दरम्यान म्हटलं आहे.


Previous
Next Post »