राणा दामपत्याला न्यायालयाचा दणका, 14 दिवसाची सुनावली न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यास दिला नकार
मुंबई : रवी राणा व नवनीत राणा यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केल्याने 14 दिवसाच्या तुरुंगावासाची कोठडी न्यायालयाने सुनावली. हनुमान चालीसाचे वाचन मातोश्रीवर करण्याचे आव्हान राणा दामपत्यानी केलं होतं.दोन धर्मामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा व कायदा सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला गेला.त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणा दामपत्य असा संघर्ष चिघळला. राणा दामपत्याना पोलिसांनी 149 नोटीस देऊन सुद्धा ते ऐकले नाहीत .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन हनुमान चालीसा वाचन करणारच अशा प्रकारची अडमुठी भूमिका या दोघांनी घेतली होती. त्यामुळे कोण्या एका पक्षाच्या सांगण्यावरून थेट सरकारला आव्हान केल्यामुळे पोलिसांनी राणा दामपत्याच्या घरी जाऊन त्यांना अटक केली.
त्यानंतर त्या दोघांना रविवारी सकाळी वांद्रे येथील महानगर दांडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडली. 124 अ अंतर्गत म्हणजेच राजद्रोहाचा गुन्हा राणा दामपत्याविरुद्ध दाखल झाला असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. तर राणा यांचे वकील असीम मर्चंट यांनी देखील बाजू मांडत राणा दामपत्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले असल्याचे न्यायालयात सांगितले.
मात्र दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्या नंतर न्यायालयाने राणा दामपत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच राणा दामपत्याच्या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.जामीन अर्जावर
29 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon