मुंबईतील झवेरी बाजारातील चामुंडा बुलियन कंपनी वर जीएसटी विभागाचा छापा, 10 कोटी ची रोकड आणि 19 किलो चांदीच्या विटा केल्या हस्तगत
मुंबई : मुंबईतील झवेरी बाजारात असलेल्या चामुंडा बुलीयन कंपनी वर जीएसटी विभागाने छापा टाकून तब्बल 10 कोटी रुपयांची रोकड आणि 19 किलो चांदीच्या विटा (Raid of GST department; Cash worth Rs 10 crore and 19 kg of silver bricks seized) हस्तगत केल्या. झवेरी बाजारात असलेल्या चामुंडा बुलीयन या सराफ कंपनीच्या भिंतीत लपवून ठेवलेलं कोट्यावधीचं घबाड जीएसटी विभागाच्या हाती लागलं आहे.आता प्राप्तीकर विभागाने सुद्धा याबाबत अधिक तपास सुरु केला आहे.छाप्या बाबत जीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झवेरी बाजार मधील चामुंडा बुलियन या कंपनीची सन 2019-20 मधील उलाढाल 22.23कोटी होती.तर 2020-21 मध्ये ती 665 कोटी झाली आणि 2022 मध्ये तर चक्क 1764 कोटी रुपया पर्यंत वाढवल्याने जीएसटी विभागाला संशय आला.
मागील तीन वर्षांमध्ये झालेल्या प्रचंड उलाढालीमुळे जी एस टी विभागाने अधिकची चौकशी सुरु केली.त्यामध्ये कंपनीच्या अनेक शाखांची नोंद नसल्याचे उघड झाले.त्यानंतर जी एस टी विभागाने कंपनीची झाडाझडती घेण्याचे सुरु केले. मात्र सुरुवातीला काही सापडले नाही. शेवटी कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या लहानशा जागेमध्ये भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाख रुपयांची रोकड आणि 13 लाख रुपये किंमतीच्या 19 चांदीच्या विटा सापडल्या.
राज्य करविभागाचे सहआयुक्त राहुल द्विवेदी आणि उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही करण्यात आली. ही जागा सील करण्यात आली असून प्राप्तीकर विभागालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.त्यानुसार प्राप्तीकर विभाग चौकशी करत आहे. एवढी रक्कम कोठून आणि कशी आली तसेच अजून कुठे कुठे काळे धन लपवून ठेवले आहे.याबाबतचा अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon