परभणी शहरात नववर्षाच्या दिवशीच 17 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने केली हत्या
परभणी : परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात नविन वर्षाच्या दिवशीच 1 जानेवारी रोजी एका 17 वर्षीय युकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे.नविन वर्षाच्या दिवशीच धारदार शस्त्राने हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.हत्येची घटना दर्गा रोडवरील कालव्याच्या परिसरात घडली आहे.1 जानेवारी रोजी सकाळी हत्या झालेल्या 17 वर्षीय यूवकाचा मृत देह आढळून आल्याने हत्या झालेल्या युवकाला बघण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.
या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटना स्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून मृत देह शव विच्छेदणासाठी पाठविण्यात आला होता.या हात्येप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास कोतवाली ठाण्याचे पोलीस करत अहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon