धक्कादायक! जालना जिल्ह्यातील विवाहितेने 4 मुलासह घेलली विहिरीत उडी ; पाचही जनांचा झाला मृत्यू


अंबड तालुक्यातील विवाहित महिलेने कौटुंबिक कलहातून 4 मुलासह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या 
जालना : अंबड तालुक्यातील घुंगुर्डे हदगाव येथे धक्कादायक घटना घडली असून एका विवाहित महिलेने आपल्या चार मुलासह (तीन मुली व एक मुलगा) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.दारूच्या व्यसनाधीन असले पतीच्या व कौटुंबिक छाळाला कंटाळून विवाहितेने हे टोकाचे पाउल उचले असल्याचे बोलले जाते.
या घटनेत मृत पावलेल्यांची नावे गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी (32 वर्ष), भक्ती (13 वर्ष), ईश्वरी (11 वर्ष),अक्षरा( 9 वर्ष) आणि युराज (7 वर्ष )अशी आहेत.गंगासागर अडाणी या गुरुवारी दुपारी आपल्या 4 मुलासोबत शेतात गेल्या होत्या परंतु त्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे पती ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी गंगासागर व त्यांचे 4 मुलं यांचा विहिरीत व जायकवाडी कालव्यात सर्वत्र शोध घेतला परंतु गंगासागर व मुलांचा शोध लागला नाही.

शुक्रवारी सकाळी गावातील काही लोकांना ज्ञानेश्वर अडाणी यांच्या शेताशेजारी गणेश फिसके यांच्या विहिरीत गंगासागर व 4 मुलं पाण्यावर तरंगत असताना दिसून आले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आल्याने पोलिसांनी घटना स्थळी येऊन पाचही मृत देह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला व तिथेच पाचही जनांचे शव विच्छेदन करण्यात आले.या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
Previous
Next Post »