या प्रकरणी सीडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या पीडित अल्प वयीन मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती.दिलेल्या तक्रारी नुसार 27 जानेवारी 2019 रोजी रात्री 10 वाजता आरोपी बापाने पत्नी बाळातपणासाठी माहेरी गेल्याची संधी साधून पोटच्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केला होता. या नराधम बापाने त्यानंतर अनेक वेळा बलात्कार केला असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.
वरील प्रकरणात औरंगाबाद सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो व बालअत्याचारानंतर्गत विविध कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक साधना आढाव यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं. या प्रकरणात सरकारी वकील सुरेश शिरसाठ यांनी साक्ष नोंदवल्या होत्या.अत्याचार पीडित मुलीची आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. साक्षी पुरावे तपासल्या नंतर न्यायालयाने आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरीसह 50 हजारांच्या दांडाची शिक्षा ठोठावली
ConversionConversion EmoticonEmoticon