चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या बंगल्यात चोरी, तिघांना अटक
चोरीचा उद्देशाने खासदारांच्या बंगल्याच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र चोरांच्या हाती काहीही ऐवज लागला नाही. त्यामुळे संतापलेल्या चोरट्यांनी बंगल्यातील सामानाची तोडफोड करून नासधूस केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.खासदारांच्या घरात चोर घुसून चोरी करण्याचा प्रयत्न होत असेल तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेच काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर यांच्या 'सूर्यकिरण' या बंगल्यावर हा चोरीचा प्रकार घडला आहे. चोरी करण्यापूर्वी बंगल्याची रेकी केली गेली.बंगल्यात कोणी नाही हे बघून चोरी करण्याच्या उद्देशाने बंगल्याचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांच्या हाती काहीही लागले नाही. खासदारांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. याप्रकरणी तिघांना अटक केली असून चोरट्यांनी यापूर्वी दोन घरफोड्या केल्या असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.
याप्रकरणी टीव्ही 9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार शंकर नेवारे, तन्वीर बेग,आणि रोहित इमलकर अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.बंगल्यातील सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. बंगल्यात मौल्यवान वस्तू नसल्याने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांचं फार मोठं नुकसान झालेलं नाही.मात्र घरातील सामानाची मात्र नासधूस चोरट्यांनी केली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon