परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली
परभणी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकित मांडण्यात येणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली आहे.परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन व्हावे यासाठी मागील अनेक वर्षांपासून परभणी करांची मागणी आहे. त्यासंदर्भात मागील काही दिवसापूर्वी खासदार संजय जाधव यांच्यानेतृत्वाखाली मोर्चा आणि आंदोलन ही करण्यात आले होते, तसेच विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संघटना व व्यापारी संघटना यांनी सुद्धा धरणे आंदोलन केले होते.त्याच पार्शवभूमीवर 17 सप्टेंबर रोजी मराडवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांनी परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याची घोषणा केली होती. त्या अनुसंगाने प्रशासकी मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. गुरुवारी विधान परिषदेत विचारलेल्या लेखी प्रश्नाबाबत उत्तर देताना परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालय स्थापण्या बाबतचा प्रस्ताव मंत्री मंडळ बैठकीत मंडण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी सांगितले आहे.
तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा निश्चितीचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्ताकडून प्राप्त झाला असल्याचेही देशमुख यांनी सांगितले आहे.याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात लेखी माहिती दिली असल्याने लवकरच वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार असल्याची शक्यता आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon