महिला अत्याचार : शक्ती विधेयक विधानसभेमध्ये एक मताने मंजूर


महिला शक्ती कायद्याला मंजुरी, राज्यपाल आणि राष्ट्रपती अधिसंमती नंतर शक्ती कायद्याची होणार अंमल बजावणी 
मुंबई : महिलावरील होणाऱ्या अत्याचाराबाबतीतील गुन्ह्याकरिता अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद असणारं 'शक्ती' विधेयक गुरुवारी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधानसभेत एक मताने मंजूर करण्यात आले.हे विधेयक शुक्रवारी विधानपरिषद मध्ये येणार असून राज्याचे राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या आधीसंमतीनंतर शक्ती कायद्याची अंमलबजानी केली जाईल.
मागील अधिवेशनातच या शक्ती कायद्यासंबंधीचे विधेयक अधिक विचारासाठी संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात आलेले होते.संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी विधानसभेत सादर केला होता.समितीने सुचवलेल्या सुधारणासह शक्ती कायद्या बाबत चे विधेयक गुरुवारी विधान सभेमध्ये मंडण्यात येऊन एक मताने मंजूर करण्यात आले.
शक्ती कायद्यानुसार बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला मृत्यूदंड तर ऍसिड हल्ला करणाऱ्या आरोपीला 15 वर्षाची शिक्षा होण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.तसेच खोटी तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीला 1ते 3 वर्षापर्यंतचा कारावास किंवा एक लाख रुपये दंडाची शिक्षा थोठावण्यात येणार आहे.
Previous
Next Post »