Beed road Accident : बीड जिल्ह्यात रिक्षा आणि कारचा भीषण अपघात ; 4 ठार,5 जन जखमी


Accident : बीड जिल्ह्यात रिक्षा व कारचा भीषण अपघात, 4 ठार, 5 जखमी 
बीड : समाजातील व्यक्तीचा  स्मशानभूमितून राख सावडण्याचा कार्यक्रम आटपून अंबाजोगाईकडे रिक्षाने परत जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव कार ने धडक दिली. या अपघातात रिक्षातील तिघे प्रवाशी व चालक असे 4 जन ठार झाले आहेत. सदरील घटना गुरुवारी केज अंबाजोगाई रस्त्यावर 'होळ' या गावाजवळ सायंकाळी 6-7 वाजेच्या दरम्यान घडली असल्याची माहिती आहे.

या भीषण अपघातात मच्छिन्द्रसिंग ग्यानसिंग गोके, प्रिया दिपकसिंग गोके,वीरसिंग दिपकसिंग गोके (रा.केज) आणि रिक्षा चालक बालाजी मुंडे (रा.पिसेगाव ) या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर हरजितसिंग बादलसिंग टाक,चंदाबाई बादलसिंग टाक,मालासिंग दुर्गासिंग (रा. जालना ) व दिपकसिंग मच्छिन्द्रसिंग गोके,गोविंदसिंग मच्छिन्द्रसिंग गोके (रा.केज ) हे सर्व पाच जन गंभीर जखमी झाले असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की,केज येथील शिकलकरी समाजातील नागरिक हे त्यांच्या समाजातील चरणसिंग गोके यांचा अंत्यविधीनंतर राख सावडण्याचा कार्यक्रम आटपून सायंकाळी अंबाजोगाई कडे रिक्षाने जात असता हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सा.पोलीस निरीक्षक डॉ संदीप दहिफळे व त्यांचे पथक अपघात स्थळीदाखल झाले व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

उपविभागीय कार्यकारी दांडाधिकारी तथा उपजिल्हाधिरी शरद झाडके, सा. जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी अपघात स्थळी भेट देऊन पाहाणी केली आहे.
Previous
Next Post »