परभणी : शहरातील नवजीवन कॉलनी येथे वर्षावासानिमित्त मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन सुरु आहे. त्यानिमित्ताने दि.19 जुलै 2022 मंगळवार रोजी भिम टेकडी औरंगाबाद येथील पु. प्रा. धम्मदर्शना महाथेरी (एम ए. बी एड, एम एड, एम फिल पाली ) यांनी नवजीवन कॉलनी येथील बुद्ध विहारात ग्रंथ वाचनाच्या निमित्ताने भेट देऊन उपस्थितांना धम्मदेशना दिली.
त्यांनी मानवी जिवनात असलेलं पंचशीलाचं महत्व पटवून देताना जीवनात पंचशीलाचे पालन करण्याचे सांगितले.
मानवाची खरी संपत्ती ही त्यांचे आरोग्य आहे. म्हणून भारतीय विनय अलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र भिम टेकडी औरंगाबाद येथे शंभर खाटांचे डॉ बी आर आंबेडकर हॉस्पिटल उभारण्यात येत असून या हॉस्पिटल मार्फत सर्व समाजातील रुग्णांना मोफत रुग्णसेवा देण्याचा मानस या संस्थेचा आहे.त्यासाठी दानशूर उपासक उपासिकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन देखील पु प्रा. भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरी यांनी केलं.
यावेळी उपासिका भाग्यश्री सरोदे यांनी भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरी यांना भोजन दान दिले. यावेळी वैशाली महिला मंडळाच्या उपाध्यक्षा मानसी वाव्हळे, सचिव करुणाताई दिपके, त्रिशला निसरगंध, किरण पंचांगे, जयश्री अंभोरे, सुषमाताई बनसोडे, रोहिणी मोरे,दिक्षा वाघमारे,सुशीला ढाले,संगीता साळवे, कांता वाघमारे,पवित्रा मगरे, वंदना नंद, नंदा कांबळे, दैवशाला गायकवाड मंडोदरी वाघमारे, खिल्लारे तसेच बन्सीधर मस्के व हर्ष पंचांगे आदी उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon