बंगरुळू येथील घटनेच्या निषेदार्थ सेलूत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद


बंगरुळू येथील घटनेच्या निषेदार्थ सेलू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

सेलू : परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात बंगरुळू येथील घटनेच्या निषेदार्थ पुकारलेल्या बंदला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. मागील आठवड्यात कर्नाटकातील बंगारुळू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात समाज कंठकांनी विटंबना केली होती. त्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात सर्वत्र पाहायला मिळाले.
 त्याच पार्शवभूमीवर आज सेलू शहरात निषेध व्यक्त करण्यासाठी शिवगर्जना मित्रमंडळ व इतर शिवप्रेमिंच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते.शहरातील  मुख्य बाजार पेठेतील व्यापारी व इतर लहान सहान सर्व दुकानदारांनी कडकडीत बंद पाळून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कर्नाटकातील बंगरुळू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेमुळे शिवप्रेमिंच्या भावना दुखावल्या गेल्याने संतापाची लाट निर्माण झाली होती.
 म्हणून त्या घटनेच्या निषेदार्थ आज 24 डिसेंबर रोजी सकाळी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्व शिवप्रेमी यांचा जमाव झाला. जमलेल्या शिवप्रेमिंनी सेलू शहर बंदची हाक दिल्याने शहरातील सर्व हॉटेल्स, छोटी छोटी दुकाने व्यापारी बाजार पेठ पूर्ण पणे बंद ठेऊन या बंदला पाठिंबा दिला.तसेच शहरातील शाळा ही सोडून देण्यात आल्याने सेलू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.
बंद प्रसंगी शिवगर्जना मित्रमंडळाचे पदाधिकारी पवन घुमरे,अशोक शेलार, जयसिंग शेळके,बालाजी झमकडे, विक्रांत पाटील, कृष्णा गायकवाड, हर्षद देशमुख,रमेश अग्रवाल, नाथा खांडेकर, दिपक चव्हाण,गणेश निवळकर,गुडडू दीक्षित,शैलेश डुबल, पवन आडळकर,संदीप लहाने,कपिल फुलारी,विनोद तरटे,रघुनाथ बागल आदी शिवप्रेमिंची उपस्थिती होती.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng