परभणीत सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी समता सैनिक दलाने मानवंदना देऊन केले अभिवादन

परभणीत राहुल नगर येथे समता सैनिक दलाच्या वतीने सुभेदार मेजर रामजी आंबेडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
परभणी : आज 2 फेब्रुवारी रोजी शहरातील रघुदास गृहनिर्माण संस्था, राहुल नगर येथे भारतीय संविधानाचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता सुभेदार मेजर रामजी (सकपाळ )आंबेडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ शामसुंदर वाघमारे यांनी सुभेदार रामजी आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात किती मोलाचा वाटा होता हे त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना माहिती देऊन सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव केला.

या कार्यक्रमाला सुबोध कांबळे,प्रा. शिवाजी कांबळे, समता सैनिक दलाचे परभणी जिल्हा प्रमुख गोपीनाथ कांबळे, ग्यानोजी गायकवाड आणि किरण बलखंडे तसेच समता सैनिक दलाचे युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng