बदलापुरात सॅम्युएल नावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने त्याला भगवती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बदलापूर : बदलपुरात एका बार मध्ये तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची थरारक घटना घडली. भांडण सोडवायला मध्यस्ती केल्याचा राग आल्याने सॅम्युयल नावाच्या तरुणच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सीसी टीव्हीत कैद झाली.बदलापूरातील हेपेंद्रपाड्यात राहत असलेला चेतन वाघेरे उर्फ बब्या हा गुन्हेगारी पार्शवभूमी असलेला तरुण आहे
शुक्रवारी चेतन वाघेरे आणि इब्राहिम नावाचा तरुण यांच्यात काहीतरी वाद सुरु होता.वाद मिटवण्यासाठी सॅम्युयल जॉन नावाचा तरुण मध्यस्ती करण्यासाठी येऊन वाद मिटवला. त्यानंत चेतन वाघेरे याने सॅम्युएल हा बिअर पाजण्यास सांगितले. त्यानंतर सॅ म्युएल जॉन हा चेतन वाघेरे याला घेऊन जवळच्याच अदिती बार मध्ये गेले.बार मध्ये गेल्यानंतर चेतन हा बाथरूम ला जाऊन येतो म्हणून गेला आणि येताना किचन मधून धारदार कोयता घेऊन आला.
सॅम्युएल जवळ येताच चेतन याने सॅम्युएल च्या माने वार सपासप वार केले.या घटनेत जखमी झालेल्या सॅ म्युएल ला भगवती हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले.सॅम्युयलने दिलेल्या तक्रारीवरून चेतन वाघेरे याला बदलापूर पश्चिम पोलिसांनी अटक केली आहे.तसेच हॉटेल मधून एखाद्या ग्राहकला कोयता कसा काय दिला जातो असा प्रश्न करून बार मालकावर सुद्धा कार्यवाही करण्याची मागणी सॅम्युएल यानी केली आहे. दरम्यान घटनेचा सर्व थरार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon