हिंगोलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा क्रूझर जीपच्या धडकेने मृत्यू

               (अपघातातील दुचाकी )

महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकी वरून कॉलेजला जात असताना क्रूझर जीप या वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू
हिंगोली : अनेक महिन्यापासून बंद असलेले शाळा कॉलेज नुकतेच सुरु झाल्याने विद्यार्थी शाळा कॉलेज मध्ये जाऊ लागले आहेत. तसाच 12 विच्या वर्गात शिकणारा महाविद्यालयीन तरुण कॉलेजला जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला.घरून कॉलेजल जाण्यासाठी निघाला मात्र आजचा दिवस त्याच्यासाठी जीवनातला अखेरचा ठरला तो कधीच घरी परत न येण्याचा.

नरसी -सेनगाव रोडवर बाहेती पेट्रोल पंप समोर क्रूझर जीप ने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.एकनाथ हरिभाऊ जुमडे असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो तालुक्यातील जांभरून अंध या गावचा आहे. हिंगोलीतील एका कॉलेज मध्ये तो 12 विच्या वर्गात शिक्षण घेत होता. सकाळी 7 :15 च्या सुमारास एकनाथ हरिभाऊ जुमडे (18 ) दुचाकी (क्र एम एच 38 वाय 0630) ने नेहमी प्रमाणे कॉलेज ला जात असताना बाहेती पेट्रोप पंप समोर हिंगोली हून सेनगाव कडे भरदाव वेगाने जाणाऱ्या क्रूझर जीप (एम एच 38 7197) ने धडक दिल्याने एकनाथ जुमडे गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे आणि गणेश जाधव घटनास्थळी आले. त्यानी खाजगी वाहनातून  उपचारासाठी एकनाथ ला सेनगाव ला घेऊन गेले परंतु तेथील दवाखाना बंद असल्याने हिंगोली घेऊन निघाले परंतु वाटेतच एकनाथ जुमडेचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng