कोल्हापूर : अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम गुन्ह्याखाली 2 महिलांसह चौघांना सक्त मजुरीची शिक्षा


कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने 2 महिलांसह चौघांना ठोठावली सक्त मजुरीची शिक्षा, तिघांना 10 वर्ष तर एकाला 2 वर्ष 
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवार 6 एप्रिल रोजी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम गुन्ह्यातील 2 महिलांसह चौघांना सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.यातील सरिता रणजित कदम (वय 41), मनीषा प्रकाश कट्टे (वय 30 ), विवेक शंकर दिंडे (वय 31) या तिघांना 10 वर्ष सक्त मजुरी आणि 29 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर वैभव सतीश तावस्कर (वय 28 रा. सोलापूर ) याला 2 वर्ष सक्त मजुरी व 4 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

सरिता पाटील ही महिला कळंवा येथील एका इमारतीत कुंटन खाना चालवत असायची.त्यासाठी दिंडे आणि तावस्कर हे परिस्थितीने गरीब व असाहाय मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि सरिता पाटील या आरोपी महिलेकडे वेशाव्यवसाय करण्यासाठी घेऊन जात असत. मात्र 2019 साली सरिता पाटील चालवत असलेल्या कुंटन खाण्यावर पोलिसांनी धाड टाकून एका पीडित मुलीची सुटका केली होती. तसेच तपासा दरम्यान एका मुलीची विक्री केल्याचे उघड झाले होते.

या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर पाटील यांनी वरील आरोपिंना शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून मंजुषा पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng