बिहारमध्ये एका छापेमारीत कार्यकारी अभियंत्याच्या घरी सापडले एवढे घबाड
पाटणा: बिहारमधील एका कार्यकारी अभियंत्याच्या घरी दक्षता पथकाने छापा टाकला होता. छापेमारी दरम्यान मोठे घबाड सापडल्याचे आढळून आले आहे.कार्यकारी अभियंता अभय कुमार सिंह याने एवढी धनसंपत्ती जमावल्याचे पाहून दक्षता पथकही आवाक झाले.या कार्यवाहीत 95 लाख रोख रक्कम, सव्वाकिलो सोने आणि 3 किलो चांदीच्या विटा व इतर मेद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सरकारच्या या कार्यवाहीमुळे इतरही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दानानले आहेत.
उत्तपन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक धनसंपत्ती असल्याच्या तक्रारी बिहार मध्ये आल्या होत्या. त्याच पार्शवभूमीवर हे कार्यवाही करण्यात आली होती.अजयकुमार सिंह याने अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे आढळून आले आहे.त्यासंबंधीचे कागदपत्रे आणि विविध बँक खात्याचे खाते पुस्तक ही हस्तगत करण्यात आले आहे.तसेच जमिनीसंबंधी असलेले कागदपत्रे हस्तगत केले आहेत. याच सोबत चांदीच्या तीन विटा सापडल्या असून त्याचे वजन तीन किलो आहे. शिवाय 4 दुचाकी सुद्धा सापडल्या आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon