रेल्वेमध्ये 20 वर्षीय तरुणीने घेतला घळफास ; स्वराज एक्सप्रेस मध्ये घडली घटना

स्वराज एक्सप्रेस मध्ये 20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या, मृत देह डहाणू येथे उतरविण्यात आला 
मुंबई : रविवारी दुपारी एकाच्या सुमारास भरधाव  रेल्वे मध्ये एका 20 वर्षीय तरुणीने  घळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत तरुणी स्वराज एक्सप्रेस मधील सौचालयात गेली होती. बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही. त्यानंतर आजूबाजूच्या प्रवाशांनी याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली.त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी सौचालयाचा दरवाजा तोडून बघितले असता तरुणीचा मृत देह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

तरुणीने कपड्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.या धक्कादायक प्रकाराने रेल्वे डब्ब्यात एकच खळबल उडाली.या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाल्याने दुपारी एकच्या सुमारास डहाणू रोड आरएस येथे स्वराज एक्सप्रेस या गाडीला विशेष थांबा देण्यात आला. त्यानंतर तरुणीचा मृत देह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

स्वराज एक्सप्रेस ही मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जम्मू काश्मीर मधील माता वैष्णवी देवी कटरा (SVDK )पर्यंत जाणार होती. मात्र दुपारी एकच्या सुमारास 20 वर्षीय तरुणीचा मृत देह धावत्या गाडीत आढळला.त्यानंतर रेल्वे प्रशासनाने मृत देह उतरून डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला.
Previous
Next Post »