ठाणे : पैशाच्या वादातून एका महिलेची निर्घृण हत्या


ठाण्यात उसने पैसे परत देण्याचा तगादा लावल्यामुळे माहिलेचा निर्घृण खून 
ठाणे : उसने पैसे परत देण्याचा तगादा लावल्यामुळे परिसरातील एका मुलाने व त्याच्या आईने 39 वर्षीय महिलेचा आपल्याच घरात बेदम मारहाण करत तीक्ष्ण व धारदार हत्याराने निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. रविवारी सकाळी 7 वाजता कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात ही घटना घडली. या खून प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

खून झालेल्या महिलेचे नाव रंजना जैसवार (वय 39) असून ती ब्युटीपार्लरचा व्यवसाय करत होती. तर पती राजेश हा मुंबई मध्ये सेल्समनचे काम करतो.मलंग रोड वरील चक्की नाका येथील प्रभावती निवासमध्ये तीन मुलांसह हे कुटुंब रहात होते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैस्वार कुटुंब रहात असेल्या परिसरात राजभर कुटुंब देखील रहाते.राजेश जैस्वार आणि पत्नी रंजना यांची राजभर कुटुंबाशी चांगले संबंध होते. राजभर कुटुंबातील अजय हा रंजनाचा चांगला मित्र असल्यामुळे रंजनाने अजय राजभर याला एक लाख रुपये उसने दिले होते.

रंजना जैस्वार ही अजय राजभर याला पैसे परत देण्यासाठी तगादा लावत होती. शेवटी अजयच्या कुटुंबाला पैशाबाबत रंजनाने सांगितले. तेव्हापासून रंजना व राजभर कुटुंबात नेहमी वाद होत असत.याचा राग मनात राग असल्याने व सतत पैसे परत देण्याचा तगादा लावत असल्याने राजभर कुटुंबियांनी आपल्याच घरात रंजना जैस्वार हिला अजयचा भाऊ विजय व त्याच्या आईने बेदम मारहाण करत तीक्ष्ण व धारदार चाकूने सपासप वार करून रंजनाचा निर्घृण खून केला.

शनिवारी राजेश जैस्वार हा घरी आल्यानंतर पत्नी रंजनाला फोन लावून विचारले असता मी घरी येत आहे असे तिने सांगितले. बराच वेळ झाल्यानंतर ही रंजना घरी आली नसल्याने राजेश ने पुन्हा फोन लावला मात्र फोन बंद येत होता. त्यानंतर राजेशने रंजनाची शोधाशोध सुरु केली. रातभर रंजना घरी परत न आल्याने चिंतेत असलेला राजेश रंजनाला शोधण्यासाठी रविवारी सकाळी बाहेर जात असताना राजभर कुटुंबाच्या घराजवळ लोकांची गर्दी जमा झाली होती. राजेश तिथे गेला असता ओट्यावर रंजनाचा मृत देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

उसने दिलेले एक लाख रुपये परत मागत असल्यामुळे अजय राजभर त्याचा भाऊ विजय व आई लालसदेवी यांनी रंजनाला शिवीगाळ, बेदम मारहाण व धारदार चाकूने वार करून खून केल्याची तक्रार रंजनाचा पती राजेश जैस्वार यानी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिली.
याघटनेचा अधिक तपास कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम करत आहेत.
Previous
Next Post »