पुतला विटंबना प्रकरणी परभणीत बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी :कर्नाटकातील बंगारुळू येथे मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञात समाज कंठकांकडून विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहेत. देशाचा लोकसभेत देखील याबद्दल तीव्र पडसाद उमटल्याचे काल पहायला मिळाले. त्याच पार्शवभूमीवर आज परभणीत देखील त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.सोमवार 20 डिसेंबर रोजी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आणि शिवप्रेमी संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरूढ पुतळ्याला दुग्ध अभिषेक घालण्यात आला होता. आणि त्याच दिवशी बुधवारी 22 डिसेंबरला परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी 10 वाजल्या पासून शहरातील मुख्य बाजार पेठा बंद करण्यात आल्या होत्या. शहरात शिवप्रेमी संघटनाच्यावतीने रॅली काढण्यात आली.शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून कर्नाटकातील शिवारायांच्या पुतला विटंबना प्रकरणी निषेध व्यक्त केला.या बंदमध्ये विविध सामाजिक, राजकीय संघटनाचे पदाधिकारी तसेच व्यापारी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी करिता बंद पुकारण्यात आला होता.
ConversionConversion EmoticonEmoticon