जालन्यातील नायब तहसीलदार 'तुषार निकम' यांच्या बदलीची बीआरएसपी जिल्हाध्यक्ष मिलिंद बोर्डे यांनी केली मागणी


                   प्रतिनिधिक चित्र 
जालना शहरात नायब तहसीलदार 'तुषार निकम' यांच्या आशीर्वादाने होते अवैध वाळूची वाहतूक 
जालना : येथील नायब तहसीलदार तुषार निकम यांच्या बदलीची मागणी करण्यात आली आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जालना जिल्हाध्यक्ष मिलिंद बोर्डे यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद व जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन देऊन नायब तहसीलदार तुषार निकम यांच्या बदलीची मागणी केली आहे. नायब तहसीलदार तुषार निकम हे जालना शहरात 3 वर्षा पेक्षा अधिक काळापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. शासन नियमानुसार 3 वर्षात बदली होणे अपेक्षित असते परंतु राजकीय वरद हस्तामुळे बदली होत नाही.नायब तहसीलदार तुषार निकम हे राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर कामे प्राधान्याने करत असल्यामुळे राजकीय दबावापोटी त्यांची बदली होत नाही.

गोर गरीब जनतेची, निराधार वृद्ध, महिला व विद्यार्थी यांची अडवणूक केली जाते.त्यांचे कोणतेही काम वेळेवर करत नाहीत.पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.तसेच अवैध रित्या गौण खनिज व वाळूचे उत्खनन व वाहतूक केली जाते. त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जाते. वाळू माफिया सोबत साठेलोटे असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही किंवा प्रत्यक्षात वाळू उपशाच्या ठिकाणी जाऊन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करत नाहीत.
अवैध धंदे व वाळू माफिया व वाहतूकदार यांच्या सोबत तहसीलदार कार्यालयात बसून सौदेबाजी करतात.शेतीच्या फेरफार संबंधी व कार्यालयीन टिप्पणी साठी प्रकारणं येत असतात अशा प्रकरणात  शेतकरी व अर्जदार यांची अडवणूक निकम यांच्याकडून केली जाते.काही प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊन ही निकम यांनी अंमलबजावणी केलेली नाही. तसेच वाटणी पत्राबाबत तर निकम यांचा फिक्स रेट असल्याची चर्चा ऐकायला मिळते असे देखील मिलिंद बोर्डे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Previous
Next Post »