भवानी नगर मधील स्वस्त धान्य दुकान रद्द करा ; बीआरएसपी जिल्हाध्यक्ष मिलिंद बोर्डे यांची मागणी


जालना शहरातील भवानी नगर भागातील मुजोर स्वस्त धान्य दुकान दाराचे दुकान बंद करण्याची बीआरएसपीची मागणी
जालना शहरातील भवानी नगर परिसरात शैलेश कक्कड यांचे स्वस्त धान्य दुकान क्र 68 असून या दुकान चालककडून नागरिकांची सातत्याने अडवणूक केल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांना रेशन दिल्यानंतर पैशाची पावती दिली जात नाही, नागरिकांनी पावती मागितल्यास त्यांच्यासोबत उद्धटपणे वर्तन करून रेशन बंद करण्याची धमकी रेशन दुकान चालकाकडून दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.महिला असो कि वृद्ध नागरिक यांना अरेरावीची भाषा केली जाते. अशा भ्रष्ट आणि नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या रेशन दुकान दाराचा पसरवाना रद्द करून दुकान बंद करण्याची मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी )चे जिल्हाध्यक्ष मिलिंद बोर्डे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
या पूर्वी सुद्धा या दुकान दाराविरोधात पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांना अनेक तक्रारी केल्या होत्या परंतु आता पर्यन्त कुठलीच कार्यवाही झाली नाही. उलट आमच्या विरोधात कुणाकडेही तक्रार करा आमचं कोणी काही करू शकत नाही. आम्ही ठरल्याप्रमाणे सर्वाना हप्ते देतो त्यामुळे तुम्ही किती ही तक्रारी केल्या तरी आमचं कोणी काही करणार नाही अशा प्रकारची भाषा रेशन दुकानदार शैलेश कक्कड नागरिकांना करत   असल्याचे मिलिंद बोर्डे यांनी निवेदनात म्हटलं आहे.

रेशन घेतल्यानंतर नागरिकांना रीतसर पावती देण्यात यावी, रेशन धारकांचे थम्ब घेऊनच रेशन द्यावे. असे ही मिलिंद बोर्डे यांनी म्हटलं आहे.नागरिकांना चांगल्या दर्जाचे व पौष्टिक धान्य दिले जावे,तसेच शेख नजीर शेख अब्दुल वाजेद यांना अनेक दिवसापासून रेशन दिले जात नाही त्यांनाही रेशन देण्यात यावे आणि रेशन धारक नागरिकांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी असे देखील मिलिंद बोर्डे यांनी म्हटलं आहे.

Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng