परभणी : डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शुक्रवार दि.3 जून रोजी महाराष्ट्राचे प्रख्यात लोक शाहीर -प्रबोधनकार प्रतापसिंग बोदडे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे प्रबोधनकार प्रतापसिंग बोदडे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने अकस्मित निधन झाले.त्यांनी अनेक अजरामर गीते लिहिली, गायली व संगीतबद्ध केली आहेत.
त्यापैकी काही गाजलेले निवडक गाणे म्हणजे, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर! एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर!!
उमरमे बाली भोली भाली शील की झोली हूं..! भीमराज कि बेटी मै तो जयभिम वाली हूं..!!
तूझ्या पाऊल खुणा भीमराया तुझी पोरं पुसू लागली..!
आज वैऱ्याच्या दरात जाऊन पंगतीला बसू लागली..!! अशा प्रकारची अनेक क्रांतिकारी प्रबोदनात्मक गाणी लिहीली, गायली व संगीतबद्ध केली आहेत.
आंबेडकरी चळवळ गीताच्या माध्यमातून गतिमान करणाऱ्या अशा महान कलावंतास भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते बी एच सहजराव, बी एन इंगोले, प्रबोधनकार प्रा. शिवाजी कांबळे,व्ही व्ही वाघमारे,शाहीर नामदेव लहाडे, शाहीर भगवान वाघमारे, विश्वनाथ झोडपे,एन.जी गोधम, गायिका सुनीता कीर्तने,लक्ष्मी लहाने, ललिता सिरसाठ, कवी गंगाधर बुद्धे,वानखेडे आदी उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon