लोणी (परभणी ) : पाथरी तालुक्यातील लोणी( बु) येथील शेतकरी व शिवसेना ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम गणपती गिराम (65) यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 24 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.धोंडीराम गिराम हे शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य देखील होते.
धोंडीराम गिराम यांना नातीचे लग्न करायचे होते परंतु जवळ पैसे नसल्याने त्यांनी बँक ऑफ मागराष्ट्रात स्वतःची आणि मुलगा सदाशिव गिराम यांचे पीक कर्जासाठी प्रकरण दाखल केले होते. बँकेने नऊ हजार रुपये भरण्यास सांगून मागील पीक कर्ज नील करा मग तुम्हाला कर्ज देऊ असे सांगितले. त्यावर धोंडीराम गिराम यांनी बँकेत नऊ हजार भरल्यानंतर तुमचे कर्ज लवकर महिन्याभारत मंजुर करण्यात येईल असे सांगितले होते.पीक कर्जाच्या भरोशावर नातीचे लग्न जमवून लग्नाची तारीखही काढण्यात आली होती . बँकेत अनेक वेळा चकरा मारून सुद्धा वेळेवर कर्ज मिळाले नाही.आर्थिक अडचणीत सापडलेल्याने नैराश्य येऊन धोंडीराम गिराम यांनी शेतात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.
ConversionConversion EmoticonEmoticon