परभणी जिल्ह्यात 8 हजार गरोदर महिलांचे लसीकरण


जिल्ह्यात 8 हजार गरोदर महिलांचे लसीकरण पूर्ण 
परभणी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. त्याच पार्शवभूमीवर जिल्ह्यातील गरोदर महिलांचे लसीकरण झाले आहे. त्यात आतापर्यंत ग्रामीण भागातून 8 हजार 353 गरोदर महिलांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला असल्याची माहिती जिल्हापरिषेदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.जिल्ह्यातील गरोदर महिलांची लसीकरणाची आकडेवारी ही समाधान कारक बाब असल्याचे सांगण्यात आले आहे.
https://amzn.to/3EotHlH
कोरोना रोग हा संसर्गजन्य असल्याने त्याचा फैलाव आणि लागण सहज होण्याची संभावना आहे.त्यामुळे कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदरीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे.जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अंचल गोयल, जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गीते,जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ रावजी सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मात्र नागरिकांत लसीबाबतीत भीती निर्माण झाली असल्याने लस घेण्यासाठी समोर यायला नागरिक घाबरत आहेत. त्यामुळे लसीकरण पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे.तरी सुद्धा अशा परिस्थितीत जिल्यातील 14 हजार 452 गरोदर महिलांपैकी 8 हजार 353 गरोदर महिलांनी लसीचा पहिला डोस घेतला असल्याने ही बाब समाधान कारक म्हणावी लागेल.गरोदर महिलांनी लसीचा डोस घेतल्याने बाळाचे आरोग्य चांगले राहत असल्याचे जिल्हापरिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng